कुडाळातील ग्रा.पं. आरक्षण सोडत

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 15, 2025 21:09 PM
views 24  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून 68 जागांपैकी 34 जागा महिलाना राखीव राहणार आहेत. अनेक उमेदवारांचा या सोडत मुळे हिरमोड झालेला पहायला मिळाला. कुडाळ तहसीलदार श्री वीरसिंग वसावे यांनी सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत सुरू केली.  ऋत्वि रुपेश धुरी वय 6 चैत्राली अविनाश वारंग. वय 6 पडते वाडी शाळा यांनी चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढली. यावेळी कुडाळ तहसीलदार श्री वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदारअमरसिंह जाधव, महसूल नायब तहसीलदार संजय गवस, निवडणूक नायब तहसीलदार प्रमोद पिळणकर, PI मगदूम साहेब, तहसीलदार कुडाळ महसूल कर्मचारी, राजकीय पुढारी, संभाव्य उमेदवार, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सोडत 50-50 झाली. 

अनुसूचित जाती प्रवर्ग पुरुष  (2) रानबांबुळी, निरुखे  अनुसूचित जाती प्रवर्ग महिला (3) बांबुळी,वाडीवरवडे, आंबडपाल, 

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे प्रवर्ग पुरुष   (1) आंब्रड, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रवर्ग महिला (0)

 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे प्रवर्ग पुरुष  (9) घोटगे , वसोली , ओरोस बुदुक, हुमरमळा-वालावल, माडयाचीवाडी, गोठोस, पुळास , कसाल , केरवडे तर्फ माणगांव . नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे प्रवर्ग महिला (9) पावशी, मांडकुली, हुमरमळा अणाव,पिंगुळी, निवजे तुळसुली कर्याद नारुर , नानेली , माणगांव, गोवेरी.  खुला प्रवर्ग पुरुष (22) भरणी, भडगाव बुद्रुक , नारुर कर्याद नारुर, गावराई , सरंबळ, वेताळ बांबर्डे , कुपवडे, वेताळ बांबर्डे , बिबवणे , हिर्लोक, कालेली , केरवडे कर्याद नारुर, घावनळे, परबवाडा पाट, सोनवडे तर्फ कळसुली, वाडोस,  नेरुर कर्याद नारुर, साळगांव, आवळेगांव - ओरोस खुर्द, डिगस , कवठी , सोनवडे तर्फ

हवेली .  खुला प्रवर्ग महिला (22) तेंडोली, वालावल , आंदुर्ले, झाराप , चेंदवण, पणदूर, पोखरण कुसबे, हुमरस, कुंदे, मुळदे, पांग्रड, तुळसुली तर्फ  माणगांव , शिवापूर, पडवे, कडावल, आकेरी, बाव, वर्दे, गिरगाव-कुसगाव, अणाव , जांभवडे, नेरुरदेऊळवाडा. 

उपस्थितीत इच्छुक उमेदवार कार्यकर्ते यांचे या आरक्षण प्रक्रियेमुळे निराशा झाल्याचे दिसून आले. बऱ्याच इच्छुक उमेदवार यांना या सोडत आरक्षण चा फटका बसणार आहे तर काही भागात नवीन संधी मिळणार असे चित्र पहायला मिळाले. उपस्थितीत अनेकांनी या सोडत वर व्यासपीठावर येऊन तहसीलदार यांच्याशी विचारविनिमय केला शंका विचारल्या मात्र ही सोडत आरक्षण बदल होणार नाही अशी सूचना तहसीलदार श्री वीरसिंग वसावे यांनी नागरिकांना देऊन त्यांचे शंका निरसन केले.

यावेळी अमरसेन सावंत, संदिप राणे ,आर.के.सावंत, नागेश आईर, अतुल बंगे, तानाजी पालव, गोट्या चव्हाण, समाधान परब, श्री.शृगारे, सचिन धुरी, राजन भगत, विनायक राणे आदी सह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.