LIVE UPDATES

मळगाव घाटात ग्राम स्वच्छता अभियान

ग्रामस्थांकडून करण्यात आले कौतुक
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 27, 2022 12:54 PM
views 163  viewes

सावंतवाडी : 27 नोव्हेंबर रोजी मळगाव घाटात ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यासाठी सरपंच स्नेहल जामदार आणि ग्रामस्थ तुलसीदास नाईक यांनी पुढाकार घेतला. श्री. देव भूतनाथ जत्रा उत्सव च्या पार्श्वभूमीवर ही साफसफाई करण्यात आली. मळगाव घाटाच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत ही साफसफाई करण्यात आली यांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

    ग्रामस्थ केतन नार्वेकर, संतोष नार्वेकर, उदय जामदार, विश्वनाथ गोसावि निलेश चव्हाण, सिद्धेश फेंद्रे, राजाराम शिरोडकर, प्रसाद नार्वेकर, समीर परब, अथर्व धुरी , निलेश नाटेकर, आर्यन लोके, प्रथमेश खडपकर, मनिष नाटेकर, उदय फेंद्रे, राजा नाटेकर, शेखर राऊळ, प्रसाद लुमाजी तर उदय जमदार यांनी टेम्पो उपलब्ध करून दिला या कचऱ्याची एका विशिष्ट जागेत जाऊन विल्हेवाट करण्यात येणार आहे.

  आपल्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्या लोकांमध्ये ही जनजागृती होणे फार गरजेचे आहे. अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.