
कणकवली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कलमठ-गुरववाडी येथील आम्ही जिजाऊच्या लेकी महिला मंडळातर्फे आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत अश्विनी जाधव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. संजना गुरव उपविजेत्या तर तिसºया विजेत्या सायली पवार या महिला ठरल्या.
आम्ही जिजाऊच्या लेकी महिला मंडळातर्फे कलमठ-गुरववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन आप्पा गुरव व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते केले. महिला मंडळाने स्वागत गीत सादर केले. त्यानंतर महिलांनी डान्स परफॉर्मन्स करीत उपस्थितांची मने जिंकली. महिलांसाठी व लहान मुलांसाठी स्पॉट गेम्स घेण्यात आले. या कार्यक्रमात कलमठ-गुरववाडी कलाकार ज्येष्ठ कलाकार सुनीता गुरव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संगीता पन्हाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. खेळ पैठणीच्या स्पर्धेत अक्षय हेदुलकर यांनी विविध खेळ घेत रंगत आणली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन पूजा गुरव यांनी केले. या कार्यक्रमांना कलमठ जि. प. सदस्या सुप्रिया मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.










