
दोडामार्ग : झरेबांबर गावचे सरपंच अनिल दत्ताराम शेटकर यांची उत्कृष्ट सामाजिक कार्य आणि ग्रामविकासातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये श्री. शेटकर यांनी ग्रामविकास, सामाजिक उपक्रम आणि लोकहिताच्या कामांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित झाली. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने त्यांना गौरविण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा दि. २५ एप्रिल २०२६ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्याf मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असून, त्यामध्ये अनिल दत्ताराम शेटकर यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शेटकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










