कणकवलीत उद्या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) प्रमुख मार्गदर्शक - गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 08, 2023 13:10 PM
views 372  views

कणकवली : कणकवलीत उद्या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान ,अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांचे बालसंस्कार,, पाल्य संस्कार, गर्भसंस्कार, शिशु संस्कार, युवा प़बोधन यावर प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 9 एप्रिल  सकाळी 10.00 वाजता ,श्री चौंडेश्वरी देवी मंगल कार्यालय ,श्री चौंडेश्वरी मंदिर, कांबळे गल्ली, गणपती सानाजवळ, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग  येथे आयोजित केलेले आहे. दिंडोरी प्रणित सेवा केंद्राच्या माध्यमातून दु:खी, आर्त, पीडित मानवी मनांना आधार देण्यासाठी, नैराश्याने संकटाने भेदरलेल्या, जनसामान्यांच्या अंगी स्वामी सेवेतून जगण्याची नवी उमेद जागृत करण्यासाठी, परमपूज्य गुरु माऊलींच्या मार्गदर्शनाखाली  "20 टक्के अध्यात्म व 80 टक्के समाजकार्य" या संकल्पनेतून,एकूण 18 विभाग अंतर्गत, केंद्र स्तरावर ज्ञानदानाचे कार्य विनामूल्य स्वरूपात सुरू आहे. या उदात्त हेतूने परमपूज्य गुरुमाऊलींना अपेक्षित असे ग्राम व नागरी विकास अभियान अंतर्गत सर्वसामान्य सेवेकरी व भाविकांना काळाची गरज असलेल्या या सेवांचा याचा लाभ घेता यावा, स्वतःसह  इतरांना प्रवाहामध्ये आणून राष्ट्रनिर्मितील मूलभूत समजले जाणारे विभाग, गर्भसंस्कार, शिशु संस्कार, बालसंस्कार व युवाप़बोधन विभागांचे  मार्गदर्शन करण्यासाठी गुरुपुत्र  नितीन भाऊ व प्रशिक्षित सेवेकरी आपल्या विभागात येत आहेत. तरी आपण सर्व समस्त पालक वर्ग , विद्यार्थी, शिक्षण,सेवेकरी व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा  ही नम्र विनंती. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.