विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

माजगाव येथे मतदानासाठी मतदारांची गर्दी
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 18, 2022 10:48 AM
views 264  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान आज होत असल्याने उद्धव ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी माजगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान माजगावात आमच्याच पक्षाची सत्ता येणार असा त्यांनी दावा केला आहे.