
देवगड : देवगड येथे 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रिडा मंडळ देवगड च्यावतीने १५ ऑगस्टला प्राथमिक शिक्षक भवन देवगड येथे खुल्या व शालेय गटात कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अविनाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी, उद्योजक श्री. हनीफ शेठ मेमन,देवगड जामसंडे नगरपंचायतच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सर्वश्री जिल्हा उपाध्यक्ष दयानंद तेली,जिल्हा महिला सचिव दीक्षा तेली,देवगड तालुका महिला अध्यक्षा शामल जोशी,हर्षा ठाकूर,सिंधुरक्त मित्र संघटना देवगड तालुका सचिव प्रकाश जाधव तसेच जामसंडे तलाठी कार्यालयाचे तलाठी संतोष डांगे उपस्थित होते.खुल्या गटातील प्रथम पारितोषिक मंडळाचे उपाध्यक्ष उल्हास कमलाकर मणचेकर यांनी पुरस्कृत केले होते. तर उर्वरित सर्व पारितोषिक मंडळाच्यावतीने देण्यात आली होती.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
खुला गट - प्रथम क्रमांक विकास वसंत कुलकर्णी,द्वितीय क्रमांक योगेश आनंदा कोळी,उत्तेजनार्थ संदीप राणे व प्रकाश प्रभू.
शालेय गट - प्रथम क्रमांक आराध्य विशाल चौगुले,द्वितीय क्रमांक आकाश रामू वडार,
उत्तेजनार्थ फरहान जुबेर होलसेकर व सावेज कमालुद्दीन शेख.स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष विलास रुमडे व मंडळाचे इतर सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मंडळाचे अध्यक्ष श्री विलास रुमडे यांनी तर सूत्रसंचालन सचिव शरद लाड यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विलास रूमडे,सदानंद सावंत,विजय जगताप,विनोद मेस्त्री,शरद लाड,ऊल्हास मणचेकर,सुरेंद्र लांबोरे,गुडेकर सर शिवा पेडणेकर कु.प्रथा भावेश पटेल यानी विशेष सहकार्य केले.