
सावंतवाडी : शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी गिरगाव, मुंबई येथील साहित्य संघाच्या नाट्यगृहात एकता कल्चरल अकादमीच्या वतीने मुंबई मराठी साहित्य, गिरगाव येथे पार पडलेल्या दिमाखादार सोहळ्यात अकादमीच्या वतीने विजय सावंत यांना 'ज्योतिबा फुले पुरस्कार' देऊन नागेश मोरवेकर, कवी अजय कांडर, अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
एकता कल्चरल अकादमी सामाजिक, कला, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात गेली ३४ पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असून दरवर्षी राज्यातील आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्तिस सदर पुरस्कार दिला जातो.
यावर्षीच्या निवड समितीने कवी विजय सावंत यांचे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली पंधरावर्षे शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, एनजीओ, पालक यांच्यामार्फत केलेले काम, रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केलेले अध्यापनाचे काम व साहित्य क्षेत्रातील योगदान या सर्व बाबींचा विचार करून सदर सन्मानाने त्यांचा गौरव केला. याबद्दल सर्व स्तरातून विजय सावंत यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.