
दोडामार्ग : रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेला दोडामार्ग विजघर रस्ता येत्या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे आवश्यक आहे. पंरतू काही लोक विरोधाला विरोध करून कामात खो घालण्याचा प्रयत्न सुरू आहे रस्त्याचे काम सुरळीत व दर्जेदार होण्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करीत असताना ठेकेदारांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले पंरतू जनतेसाठी अनेक गुन्हे आम्ही घेण्यासाठी तयार आहेत. पंरतू जनतेला वेठीस धरून जनतेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही त्यामुळे पावसापूर्वी ज्या ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे त्याठिकाणीचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी उपजिल्हा संघटक विजय जाधव यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगल्या कामासाठी नेहमीच सहकार्य करणार आहे. जनतेच्या भावना विचारात घेऊन शिवसेना जनतेसाठी नेहमीच रस्त्यावर असतते परंतू चुकीच्या पध्दतीने शासनाच्या कामात अडथळा आणणे म्हणजे. कामाला विरोध होणे हे पण चुकीचे आहे. असे ते बोलताना म्हणाले.










