तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ७५ टक्के निकाल

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 13:52 PM
views 34  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालात, तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने आपले यशाचे सातत्य टिकवून ठेवले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ७५ टक्के लागला असून प्रियांका आनंद भागवत हिने ९०.८३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यावर्षी महाविद्यालयातून एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १५ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रथम क्रमांक कु. प्रियांका आनंद भागवत ९०.८३%,  द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी आनंद रेडकर ६७.५०%, तृतीय क्रमांक कु. श्रेया पंढरीनाथ रेडकर ५७.००%, चतुर्थ क्रमांक आदिनाथ अशोक गावडे ५२.६३%, पंचम क्रमांक रजत बबन काळे ५१.६७% यांनी प्राप्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.