
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेची प्रतीक्षा अखेर संपली असून या परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला गेला आहे. राज्य मंडळ अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत १२ वीचा निकालाबाबत माहिती दिली.
आज सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा अर्थात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण एकत्रित निकाल आणि सांख्यिकीय माहिती जाहीर केली जात आहे. राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला असून कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल आहे. यात सिंधुदुर्ग अन् रत्नागिरीचा निकाल पुढीलप्रमाणे...
नऊ विभागात कोकण विभाग प्रथम
कोकण विभाग: ९४.१४%
पुणे विभाग: ९२.३४%
कोल्हापूर विभाग: ९१.७९%
नाशिक विभाग: ९०.६७%
अमरावती विभाग: ९०.२२%
मुंबई विभाग: ९०.०६%
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग: ८८.६८%
नागपूर विभाग: ८६.६७%
लातूर विभाग: ८४.१४%
परिक्षेत ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली असून मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९३.१५% आहे, तर मुलांचा ८६.८०% आहे. साधारण १४ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.










