अर्ज भराताना प्रतिसाद पहाता मोठ्या मताधिक्यांन विजय : नारायण राणे

Edited by: विनायक गांवस
Published on: April 19, 2024 08:42 AM
views 433  views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी ते म्हणाले, भाजप पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचा उमेदवार आहे‌. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी ऋणी आहे‌. अर्ज भराताना मिळालेला प्रतिसाद पहाता मोठ्या मताधिक्यांन मी विजयी होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला‌. तर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांचे आभार मानले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, किरण उर्फ भैय्या सामंत आदी उपस्थित होते.