
सावंतवाडी : वेंगुर्ला तालुका कार्यकारिणी सर्वांना विश्वासात घेऊन तयार केली जाणार असून जिल्हा बँक सदस्य विद्याधर परब यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.
श्री. परब म्हणाले, निरीक्षक म्हणून विद्याधर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणूकांपूर्वी अथवा नंतर ही नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपलं म्हणणं श्री. परब यांच्याकडे कळवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अर्चित पोकळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










