
सावंतवाडी : दांडेलीतील विद्या विहार इंग्लिश स्कुलने आपली निकालाची परंपरा कायम राखलीय. १० वी चा शाळेचा निकाल यंदाही १०० टक्के लागलाय. स्नेहल सत्यवान परब ८७.८० टक्के मिळवत शाळेत पहिली आलीय. सुंदर श्रीहरी परब ८७ टक्के गुण घेत दुसरा आलाय. तर वंदना श्रीकांत कोकरे ८५.४० टक्के गुण मिळवीत शाळेत तिसरी आलीय.
शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक सदाशिव धूपकर यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच शाळा संस्था, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलंय.