विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतला मालवणी जेवणाचा आस्वाद

Edited by: भरत केसरकर
Published on: November 26, 2023 19:43 PM
views 31  views

सावंतवाडी : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर याने आज संध्याकाळी मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. सावंतवाडी राजवाडा येथील हॉटेल बुटीक आर्ट मध्ये मालवणी जेवणाचा त्यांनी येथे त्यांनी आस्वाद घेतला.  वरण - भात, मालवणी घावणे, काजू कुर्मा यासह अनेक मालवणी पदार्थाचा त्यांनी आस्वाद घेतला.

नार्वेकर हे सहकुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. गोव्यावरून थेट आपल्या घरी आल्यानंतर उशिरा राजवाडा येथील हॉटेलमध्ये दाखल झाले. आणि येथील मालवणी जेवणाचा येथे आस्वाद घेतला. यावेळी नार्वेकर यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.  त्या संपूर्ण कुटुंबाने एकत्रित जेवण केले आज राहुल नार्वेकर कुटुंब थोड्याच वेळात मातोंड येथील सातेरी देवीचे दर्शन घेणार आहेत.

ही लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नार्वेकर कुटुंबिय काल गोव्यात दाखल झाले होते. आज ते मातोंड येथील आपल्या गावी कुलदैवतेचे दर्शन सहकुटुंब घेणार आहे. 

नार्वेकर आणि राजघराणं यांचे कौटुंबिक नातं आहे. नार्वेकर यांची पत्नी निंबाळकर घराण्यातील असून राहुल नार्वेकर हे सावंतवाडी संस्थानचे जावई आहे‌त. राजवाड्यात आलेल्या पाहुण्यांच आदरातिथ्य सावंत भोसले कुटुंबियांनी केलं.