कणकवली मतदारसंघातील सर्व अर्ज वैध

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 30, 2024 09:54 AM
views 293  views

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीसाठी ८ उमेदवारांनी दाखल केलेले सर्व ९ अर्ज वैध ठरले आहेत. सध्या तरी विधानसभा मतदारसंघात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारीखेनंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे.  वि

धानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या उपस्थितीत आज पार पडली. यावेळी महायुतीचे उमेदवार आता आमदार नितेश राणे, महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, अपक्ष गणेश माने, प्रकाश नारकर आदी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सकाळी ११ वा. ही छाननीप्रक्रिया सुरू झाली. या छाननीत सर्व अर्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता या मतदारसंघात मतदारसंघात निवडणूक २०२४ साठी भाजपा महायुतीचे नितेश नारायण राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे संदेश भास्कर पारकर, अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीच चंद्रकांत जाधव, अपक्ष गणेश माने यांचे अर्ज वैध ठरले. या छाननीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे देवगड तहसीलदार लक्ष्मण कुसेकर, वैभववाडी तहसीलदार  सूर्यकांत पाटील उपस्थित होते.