मविआ'नं फोटे छापलेले पॅनल प्रमुख विद्याधर परब यांचा पाठिंबा 'युती'च्या पॅनलला !

अशोक दळवी, महेश सारंग आदींच्या नेतृत्वाखाली श्री देव पाटेकर सहकार परिवर्तनचा विजय निश्चित : दीपक केसरकर
Edited by:
Published on: November 08, 2022 17:51 PM
views 318  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत जिल्हा बँक संचालक विद्याधर परब यांचा फोटो विरोधी महाविकास आघाडी पॅनलने आपले प्रमुख म्हणून छापला होता. परंतु, त्यांचा पाठिंबा हा भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना यांच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलला आहे. त्यांचा फोटो मविआकडून छापण्यात आला मात्र, त्यांनी आमच्यासोबत राहत युतीच्या पॅनलला पाठिंबा दिला असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महेश सारंग, अशोक दळवी, गुरूनाथ पेडणेकर, नारायण उर्फ बबन राणे यांसह युतीचे पदाधिकारी विजयासाठी अथक मेहनत घेत असून ते पॅनलच नेतृत्व करत आहेत. त्यामुळे हे पॅंनल नक्कीच विजयी होईल असा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. तर विरोधी पॅनलने प्रमुख म्हणून विद्याधर परब यांचा फोटो जरी छापला असला तरी त्यांचा पाठिंबा हा आमच्या युतीच्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलला आहे अस मत त्यांनी व्यक्त केल.