अडीच लाख मताधिक्याने विजय पक्का | दोडामार्गची जनता माझ्या बाजूने : विनायक राऊत

Edited by:
Published on: April 29, 2024 12:00 PM
views 298  views

दोडामार्ग : मंत्री आसलेल्या दीपक केसरकर यांनी खरं तर हत्ती प्रश्न सोडविणे आवश्यक होते. हक्काची वीज या तालुक्याला देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता, आडाळी एमआयडीसी सुरु करायला पाहिजे होती. शेतकऱ्यांचा काजुला हमीभाव हा जिव्हाळ्याचा प्रश्न प्रधान्याने सोडवायला हवा होता, मात्र, त्यांना ते जमलं नाही. 

दोडामार्ग हा माझा परिवार आहे, या परिवाराचा, सर्वासामान्यांचा मी खासदार आहे, त्यामुळे आपल्या परिवाराचे वरील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आता मी घेतो, आपण फक्त आशीर्वाद द्या असे आवाहन इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दोडामार्ग येथील प्रचार सभेत केला. 

 यावेळी विनायक राऊत यांचे समवेत माजी मंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, अर्चना घारे, जिल्हाध्यक्ष संजय पडते, अमित सामंत,  शैलेश परब, विवेक ताम्हणकर, इर्शाद शेख, जानवी सावंत, अण्णा केसरकर, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सुभाष दळवी, संदीप गवस, डॉ. जयेंद्र परुळेकर, तालुकाप्रमुख संजय गवस, प्रदीप चांदेलकर, वासुदेव नाईक, सागर नानोसकर, मदन राणे, संदीप धरणे, संदेश वरक, संदेश राणे, विजय जाधव, लाडू जाधव, दिवाकर गवस, भिवा गवस, शुभम धरणे, प्रवीण परब, सावली पाटकर, सेजल नाईक,  विनिता घाडी, लीना कुबल, श्रेयाली गवस आदी उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी व नेते अण्णा केसरकर, जयेंद्र परुळेकर, अर्चना घारे, सुरेश दळवी, प्रवीण भोसले आदींनी खासदार विनायक राऊत यांच्यासाठी भाषण केली.