विभव राऊळ याने पटकावला जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत तृतीय क्रमांक

Edited by: विनायक गांवस
Published on: October 04, 2025 21:05 PM
views 95  views

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी च्या कु. विभव विरेश राऊळ याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ रोजी ओरोस येथे पार पडली.

'संभाव्यता व आव्हाने' या विषयावर विभवने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने आपले अभ्यासपूर्ण विचार प्रभावीपणे मांडले. त्याच्या या उत्कृष्ट सादरीकरणामुळेच त्याला हे यश मिळाले. या यशाबद्दल विभवला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कामगिरीसाठी त्याला प्रशालेचे विज्ञान शिक्षक मिहीर राणे, फरजाना मुल्ला आणि श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. संदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विभवच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतिश सावंत, तसेच मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर आणि प्रशालेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.