व्हि. पी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: July 08, 2024 11:33 AM
views 276  views

सावंतवाडी : व्हि. पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत गोवा राज्यातील इनक्युब इथिकल्स प्रा. लि या नामांकित फार्मा कंपनीमध्ये बी फार्म, डि फार्म या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मुलाखतीत एकुण 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांची मॅन्युफॅक्चरींग, प्रोडक्शन व पॅकेजिंग डिपार्टमेंटसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रेरणास्थान, माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.राहुल पाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.सुनील शिंगाडे ,प्लेसमेंट ऑफिसर व एचऒडी डॉ.संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.