
कुडाळ : तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील श्री देव वेतोबा मंदिराच्या शिखर कलशारोहण व श्री देव वेतोबा मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना सोहळा २२ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता श्री देव वेतोबा यांच्या नूतन मूर्तीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन, सायंकाळी ६ वाजता बालगोपाल मित्रमंडळ (वेताळबांबर्डे) यांचा हरिपाठ व न्यू इंग्लिश स्कूल (पणदूर तिठा) च्या विद्यार्थ्यांचे गायन, रात्री ८ वाजता श्री देव वेतोबा दशावतार मंडळ (वेताळबांबर्डे) यांचे नाटक, २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रायश्चित विधी, विष्णू पूजन, देवता पूजन गणेश पूजन, स्वातीपुण्याहवाचन, मातृकापूजन नांदीश्राद्ध, आचार्यवरण, प्राकारशुद्धी, कौतुकाभिमंत्रण, शांतीहोम, गणेशयाग, मंडपप्रतिष्ठा, जलाधिवास, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, २ वाजता ग्रामस्थांची भजने, सायंकाळी ६.३० वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता कीर्तनकार हरिहर नातूबुवा (पुणे) यांचे कीर्तन, हार्मोनियम पप्पू नाईक (कुडाळ), तबला शिवाजी पवार (गोठोस), पखवाज गजानन देसाई (वालावल )यांची संगीतसाथ, २४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्राकारशुद्धी, स्नानविधी, शय्याधिवास, प्रधान देवता स्थापना, अग्निस्थापना, ग्रहस्थापना, वास्तू याग , ग्रहयाग, पर्याय होम, दुपारी १ वाजून ५० मिनिटे या शुभमूहूर्तावर श्री हरेकृष्ण भगवान पोळजी महाराज (आसोली) यांच्या हस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना, २ वाजता महाप्रसाद, २.३० वाजता ग्रामस्थांची भजने, सायंकाळी ६.३० वाजता हरिपाठ, रात्री ८ श्री महालक्ष्मी कला दिंडी भजन मंडळ (इळये - देवगड, बुवा उमेश घाडी) यांचे दिंडी भजन, ९ वाजता श्री पावणा देवी ग्रुप ( किंजवडे - देवगड ) यांचे समई नृत्य, २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्राकार शुद्धी, मंडपांतर्गत देवता पूजन, तत्व होम, ८ वाजून ५० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर देव प्रतिष्ठापना, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, २.३० वाजता ग्रामस्थांची भजने, ३ वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ, ६.३० वाजता सोलो वादन - मृदुंगनाद (सादरकर्ते - स्वामी समर्थ पखवाज क्लास (वेताळबांबर्डे) संचालक पखवाज अलंकार महेश परब (डिगस) व वेताळबांबर्डे येथील शिष्य, ७.३० वाजता दीपोत्सव, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९ वाजता सत्कार समारंभ, १० वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ (म्हापण) यांचे “कुर्मदासाची वारी” नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत.
सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान उपसमिती, श्री देव वेतोबा उत्सव मंडळ, समस्त बारापाच मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.