मराठी पत्रकार परिषदेतर्फे ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचा पुण्यात सत्कार...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 17, 2023 21:45 PM
views 87  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधीस्वीकृती समितीवर निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते आणि विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे आणि पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

परिषदेतर्फे परिषदेचे पदाधिकारी आणि अधिक किती समितीवरील अधी स्वीकृती समितीवरील नियुक्त सदस्यांचेही सत्कार करण्यात आले. पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या ऐतिहासिक सभागृह हा कार्यक्रम पार पडला. राज्यभरातील पत्रकारांच्या हिताचे उपक्रम घेण्यासाठी परिषदेतर्फे पत्रकारांमार्फत एक कोटी रुपयाचा निधी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीतून राज्यातील पत्रकारांना सहाय्य करण्यात येणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे राज्यभरातून 12 हजाराहून अधिक सदस्य सुमारे 31 जिल्ह्यामध्ये आहे ही सदस्य संख्या ही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी पत्रकार परिषद ही सर्वात जुनी म्हणजे 83 वर्षाची परंपरा असलेली देशातील एक मोठी संघटना असून गेल्या काही वर्षात परिषदेने पत्रकार हिताच्या दृष्टीने आंदोलन संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा,  पत्रकार सन्मान योजना आदी मागण्या मान्य करून घेतल्या असे मुख्य विश्वस्त असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

परिषदेचे विश्वस्त श्री. किरण नाईक यांनी आपली परिषद आणि परिषदेचे पदाधिकारी पत्रकारांच्या हाकेला रात्री दे रात्री धावून जाऊन त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. पत्रकारांचे हिताच्या दृष्टीने मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपोषण आंदोलन लढे दिले आहेत. राज्यभरात पत्रकारांनी आपले योगदान देऊन ही चळवळ आणि संघटना अधिक सशक्त आणि बलवान करावी असे आवाहन केले.

परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या कार्याचा आढावा घेऊन नियोजित उपक्रमाची माहिती दिली. परिषदेच्या उपाध्यक्ष सौ. जान्हवी  पाटील यांनी सूत्रसंचालन व  निवेदन केले. पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. परिषदेला राज्यभरातून 31 जिल्ह्यातून सुमारे दीडशेहून अधिक प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते .या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या आणि आपल्या कार्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या उपक्रमात सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन दिले.