ज्येष्ठ दशावतार कलाकार बाबुराव आसयेकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2024 14:55 PM
views 201  views

सावंतवाडी : मळगाव येथील ज्येष्ठ दशावतार कलाकार बाबुराव लाडू आसयेकर (७८,रा. मळगांव कुंभारआळी ) यांचे आज रविवारी दुपारी १ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. राजा आसयेकर म्हणून ते प्रसिद्ध  होते. अनेक नवीन व होतकरू दशावतार कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील बहुतांश सर्वच दशावतार नाट्य मंडळांमध्ये आपली कला सादर केली होती. खलनायक भूमिकांसाठी ते विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुली, जावई, पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दशावतार कलाकार तथा अभिनय सम्राट नितीन आसयेकर व दशावतारातील युवा कलाकार नारायण आसयेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांचे ते काका होत. त्यांच्या निधनामुळे दशावतारप्रेमींमधून शोक व्यक्त होत आहे.