वेताळ प्रतिष्ठानच्या जिल्हास्तरीय स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

135 स्पर्धकांचा सहभाग
Edited by: दिपेश परब
Published on: January 16, 2024 14:15 PM
views 51  views

वेंगुर्ले : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल येथील जैतिराश्रीत संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा शालेय लहान गट व मोठा गट आणि इंग्रजी माध्यम विशेष गटांमध्ये आणि संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा अशा पाच गटात संपन्न झाली.

        सदर वक्तृत्व व पाठांतर स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत पार्वती वाचनालयाचे  अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जैतिराश्रित संस्थचे खजिनदार कृष्णा तावडे व स्थानिक प्रतिनिधी प्रकाश परब, लोकमान्य बँक चे पुरुषोत्तम राऊळ, संदीप तुळसकर, प्रा.व्ही पी. नंदगिरीकर,  संजय पाटील, विवेक तिरोडकर, महेश राऊळ, प्रा.विवेक चव्हाण, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, गुरुदास तिरोडकर, केशव सावंत, अजित राऊळ, प्रा. वैभव खानोलकर, बी.टी. खडपकर, बाबुराव खवणेकर, अनिकेत ताम्हणकर, विनायक शेवडे, संजना तुळसकर, माधव तुळसकर, सचिन गावडे, मिलन तिरोडकर, हेमलता राऊळ, वैष्णवी परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

        संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर  (इ .२री पर्यंत) उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील  ४१ स्पर्धक सहभागी झाले होते. यात तनय चंद्रशेखर कुशे (रोझरी विद्यालय, मालवण) प्रथम, अदिती रोहन नाईक (केंद्रशाळा वेतोरे न.२) द्वितीय, मांगल्य वासुदेव बर्वे (सुधाताई कामत शाळा नंबर २, सावंतवाडी) तृतीय तर शर्वणी बाबुराव आपटे ( वेंगुर्ला न.१) व भूमी सचिन परुळकर ( वेताळ विद्यामंदिर, तुळस) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. 

      मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत (इ.३री ते ४थी) ४३ स्पर्धक सहभागी झाले होते. यात दुर्वा रामचंद्र सावळ प्रथम, दुर्वांकर दिगंबर जामदार द्वितीय, देवेश भगवान नवार ( भेंडमळा,वेंगुर्ला) तृतीय, अथर्व अश्विनीकुमार मांजरेकर (जि. प.शाळा, तेंडोली) व संजीत संदीप तुळसकर ( स्वामी विवेकानंद विद्यालय ,तुळस) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. 

    शालेय गट वक्तृत्व  (इ.७वी पर्यंत) गटासाठी 'मोबाईल हटवा बालपण वाचवा' या विषयासाठी २१ स्पर्धक सहभागी झाले. यात स्पृहा सुमित दळवी (केंद्रशाळा नं.०१  दोडामार्ग) प्रथम, शमिका राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल) द्वितीय,  प्रणोती विठ्ठल राऊळ ( गजानन विद्यालय,पाट) तृयीय तर यज्ञेश युवराज शिंदे (नेमळे हायस्कूल) व हर्षदा गणेश जोशी ( गजानन विद्यालय, पाट) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. 

     शालेय गटासाठी( ८वी ते १०वी) वक्तृत्व स्पर्धेत 'कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज ' हा विषयावर १९ जणांनी  भाष्य केले. यात श्रावणी राजन आरावंदेकर  ( कुडाळ हायस्कूल) प्रथम, दीप्ती तीमाजी गवसकर ( सरस्वती विद्यालय आरवली) द्वितीय, अनुष्का शेखर धुरी ( असोली हायस्कूल) तृतीय तर साक्षी महेश तुळसकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) व रश्मी मधुकर भगत (मठ हायस्कूल) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. 

     इंग्रजी माध्यम गटासाठी (इ. १० वी पर्यंत) 'दि ग्रेट लीडर छत्रपती शिवाजी महाराज' विषयावर ११ जणांनी वक्तृत्व सदर केले. यात तनिष विवेक नवार ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन) प्रथम वेदश्री विवेक चव्हाण  (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन) द्वितीय, मानसराज महेश गवस तृतीय,  रूद्र दिगंबर मोबारकर (एम.आर.देसाई, वेंगुर्ला) व राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. 

      सर्व विजेत्यांचा मान्यवरांकडून प्रमाणपत्र व बुके देऊन गौरव करण्यात आला. संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे परिक्षण अजित राऊळ व विनायक शेवडे यांनी, मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे परिक्षण बाबुराव खवणेकर व अनिकेत ताम्हणकर यांनी, शालेय लहान गट वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण प्रा.वैभव खानोलकर, संजय पाटील आणि संजना तुळसकर यांनी तर शालेय मोठा गट मराठी व इंग्रजी माध्यम या दोन्ही गटांचे परिक्षण प्रा. व्ही.पी. नंदगिरीकर आणि बी. टि. खडपकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार किरण राऊळ यांनी मानले.