कोकण विभागातून मला मिळालेल्या मताधिक्यात वेंगुर्ल्याचा फार मोठा वाटा : ज्ञानेश्वर म्हात्रे

Edited by: दिपेश परब
Published on: April 21, 2023 12:58 PM
views 175  views

वेंगुर्ले:

    कोकण विभागातून मला मिळालेल्या भरघोस मताधिक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्यातही वेंगुर्ले तालुक्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे तूमचा हक्काचा आमदार म्हणून येथील शिक्षकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न, कामे असतील ती कामे येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत आल्यास ती सर्व कामे निश्चित चे पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येथे केले.

    भाजपा वेंगुर्ले च्या वतीने येथील तालुका संपर्क कार्यालयात म्हात्रे यांचा सत्कार वेंगुर्ले भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेश जाधव सर, मुख्याध्यापक संघटना जिल्हाध्यक्ष तर्फे , माजी अध्यक्ष एम. जी. मातोंडकर सर , कुसगावकर सर , एल. आर. पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, महिला तालुकाध्यक्ष स्मिता दामले , श्रेया मयेकर , कृपा मोंडकर , शितल आंगचेकर , साईप्रसाद नाईक , वसंत तांडेल , विजय रेडकर , युुवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , किसान मोर्चाचे बाळू प्रभू , प्रितेश राऊळ , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , रसिका मठकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर , आरवली सरपंच तातोबा कुडव , महादेव नाईक , अजित राऊळ सर , वृंदा मोरडेकर , दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग , नितीश कुडतरकर , रमेश नार्वेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.