LIVE UPDATES

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी : वेदिका परब

'वेंगुर्ल्यात प्रेमाचा चहा' स्वयंरोजगाराचा शुभारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: June 13, 2026 18:43 PM
views 23  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या "प्रेमाचा चहा" या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज वेदिका विशाल परब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे शिक्षण घेत असताना स्वयंरोजगाराची कास धरणाऱ्या कृष्णा कराडे आणि अविनाश काळे या युवकांचे अभिनंदन करताना  वेदिका परब म्हणाल्या की, "कोणताही व्यवसाय लहान नसतो. शिक्षणासोबत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तुमचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे."

तसेच त्यांनी सांगितले की, भाजपा युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून लवकरच उभारण्यात येणाऱ्या भव्य हॉस्पिटलमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या कार्यक्रमास जि.प. सदस्या सुजाता पडवळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, क्रीडा सभापती सचिन शेटये, नगरसेवक रवी शिरसाठ, युवराज जाधव, नगरसेविका काजल कुबल, वृंदा गवंडळकर, हसिना मकानदार, रसिका मठकर, श्रेया मयेकर, दिपेश केरकर, साईप्रसाद भोई, शरद मेस्त्री, सुधीर डिचोलकर, योगेश नाईक, डॉ. शशिकांत परब, शेखर मालवणकर, नियाज मकानदार, घनशाम मोरजे, सौरभ भोसले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.