
वेंगुर्ले : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मूल्यमापनासाठी पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती मधील मूल्यांकन समितीने बुधवारी (१३ मे) वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतला भेट दिली व अभियानांतर्गत परीक्षण केले. यावेळी समितीमध्ये भोर गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, विस्तार अधिकारी विलास कोळी, प्रदीप ढवळे, सागर कुडले यांचा समावेश होता. यावेळी वेंगुर्ले पं स चे सभापती शंकर घारे, विस्तार अधिकारी सखाराम सावंत, सुप्रिया कोरगावकर आदी उपस्थित होते. सरपंच सत्यविजय गावडे व ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे यांनी उपस्थित समितीचे स्वागत व सन्मान केला. यावेळी उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य वामन गावडे, सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे, सीमा गावडे, संयमी गावडे, साक्षी गावडे आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मराठमोळ्या वेषभूषेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य करत समितीचे स्वागत केले तर ग्रामपंचायत पर्यंत सर्व ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुनी उभे राहत टाळ्या वाजवून समितीचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक श्री माळगावकर, श्रीम. गोडसे, अंगणवाडी सेविका अनिषा गावडे, भक्ती गावडे, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, सिआरपी शिला देवूलकर, मानसी आंगचेकर, भाईडकर, सीएचओ श्रीम.धुरी, श्री. पेडणेकर, कर्मचारी सुप्रिया गावडे, सोनू गावडे यांच्यासहित महिला बचतगट सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. समितीने गावातील मंदिर परिसर, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, नळयोजना, बंधारे, सांडपाणी व्यवस्थापन आदी ठिकाणांना भेट देत पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच गावातील विविध उपक्रमांचे कौतुक केले.










