जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची समाजकल्याण व आरोग्य समितीवर बिनविरोध निवड

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 15, 2026 19:59 PM
views 18  views

​कुडाळ : नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य रुपेश पावसकर यांची जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती आणि आरोग्य समितीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. रुपेश पावसकर यांची या दोन महत्त्वपूर्ण समित्यांवर निवड झाल्यामुळे नेरूर मतदारसंघात समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

​​पावसकर हे नेहमीच मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आणि प्राधान्याने भूमिका बजावत असतात. आता समिती सदस्य म्हणून काम करताना त्यांना जिल्ह्याच्या आरोग्य आणि समाजकल्याण धोरणांमध्ये थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे. ​​सदर निवडीबद्दल रुपेश पावसकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.