नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसलेंनी केलं 'या' महत्वाच्या कामांचं भूमिपूजन

Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2026 19:53 PM
views 63  views

सावंतवाडी : नगरपरिषद नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्यामार्फत शहरात विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. भटवाडी तारांगण पार्क रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासह भटवाडी मधुसूदन कशाळीकर घरासमोरील नाला बंदिस्त करण्याचा कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका सुनिता पेडणेकर, नगरसेवक खेमराज कुडतरकर, तौकीर शेख आदींसह येथील‌ रहिवासी उपस्थित होते.