पेट्रोल पंपासमोरच दुचाकी आणि कार धडकली

दुचाकी रस्त्याबाहेर फेकली
Edited by:
Published on: May 15, 2026 15:45 PM
views 85  views

कणकवली : मुंबई-गोवा जाणवली महामार्गावर पेट्रोल पंपा समोर शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास  दुचाकी व आर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार जाणवली येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून महामार्ग ओलांडत असताना कणकवलीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला.

अपघातावेळी दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केले असल्याने डोक्याला गंभीर दुखापत होण्यापासून बचाव झाला. मात्र अपघातात दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला असून आर्टिगा कारच्या समोरील डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदेश आबिटकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व पुढील कारवाई केली. महामार्ग पोलीस  देखील घटनास्थळी येऊन भेट देऊन गेले