
वेंगुर्ले : "गो" मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता मिळावी तसेच गो मातेचे संरक्षण, संवर्धन व्हावे या पवित्र हेतुने गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील गो पालक, गो प्रेमींनी एकत्र येत शासनाला द्यावयाचे निवेदन आज सोमवार २७ एप्रिल रोजी तहसीलदार ओंकार ओतारी यांना सादर केले. तसेच आमच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती केली. यावेळी बाबुराव खवणेकर, गिरीश फाटक, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, दिना आचार्य, गौरी मराठे, नितीन लिंगोजी, प्रज्वल कोयंडे, अभी वेंगुर्लेकर, कीर्तीमंगल भगत, विलास पालव, यशवंत कुडपकर, विद्या सावळ, सुनील खानोलकर, ॲड. प्रकाश बोवलेकर, देवदत्त सावंत, सुनील वारंग, सागर राणे, श्यामसुंदर राय, दिलीप परब, शरद परब, ओजस परब, हर्षद आरोलकर, सोहम गरगटे, प्रशांत सावंत, देवदत्त गोखले, अवधूत मराठे, संतोष सावंत, प्रदीप सावंत, बिपिन ववरसकर, दिलीप करंगुटकर यांच्यासह गो प्रेमी उपस्थित होते.
यावेळी या अभियानाचा उद्देश सांगताना बाबुराव खवणेकर यांनी गो मातेचे संरक्षण आणि गो मातेला शासनाने राष्ट्रमाता म्हणून दर्जा द्यावा यासाठी हे अभियान देशभर राबविले जात असल्याचे सांगितले. हे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे असेही खवणेकर यांनी सांगितले.










