सिंधुदुर्ग मराठी अध्यापक संघाच्यावतीने 'माय मराठी सेवा गौरव सन्मान'

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2026 17:26 PM
views 24  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्यावतीने “माय मराठी सेवा गौरव सन्मान” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. मराठी दिनाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी मराठी भाषेसाठी विविध उपक्रम घेणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो.


या कार्यक्रमास माजी शालेय शिक्षणमंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत. तर शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा त्यांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यक्रम बुधवार २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी येथे पार पडणार आहे. या वेळी जिल्ह्यातील विविध भागांतील निवडक शिक्षकांचा “सेवा गौरव सन्मान” देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सन्मानित शिक्षकांमध्ये शैलेश तांबे (वेंगुर्ला) सौ. मयूरे मनोहर कदम (सावंतवाडी) आनंद कदम (कुडाळ) सागर डेगवेकर (दोडामार्ग) विजय ठाकूर (वेंगुर्ला) सौ. स्नेहल राणे(कणकवली ) महेश धामापुरकर (मालवण)  सतापा पाटील (वैभववाडी ) बाळासाहेब डेरे (देवगड ) यांचा समावेश आहे. तसेच प्राथमिक शिक्षक गटातून उदय सावळ(बांदा) जावेद तांबोळी(चौकूळ ) नरेंद्र कारिंदेकर (कोलगाव ) सौ. किरण केंगर(दाणोली ) आणि सौ. संगीता पास्ते(निरवडे ) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. वीरपत्नी म्हणून श्रीमती गीता गावडे (चौकूळ ) व श्रीमती सीताबाई गावडे (आंबोली ) यांनाही सन्मानित केले जाणार आहे अशी माहिती संघाचे कार्याध्यक्ष भारत गावडे यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाच्या कार्यकारी मंडळाने विशेष परिश्रम घेतले असून, सर्व शिक्षक व मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.