
वेंगुर्ले : श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ उभा करण्याचा संकल्प असून वेंगुर्ले तालुक्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण वेंगुर्ले कॅम्प येथे शनिवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता संस्थेचे संस्थापक श्री. संभाजीराव विनायक भिडे गुरुजी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे.
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृती केली जाते. प्रामुख्याने हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि शिवचरित्र या विषयाला धरून कार्यक्रम केले जातात. युवकांमध्ये देशभक्ती आणि संस्कार रुजवण्यावर भर दिला जातो.
सद्या संस्थेतर्फे प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारणे चे काम सुरू आहे. दरम्यान वेंगुर्ले तालुक्यात पहिला ध्वजस्तंभ वेंगुर्ले कॅम्प येथे उभारला असून त्याचे लोकार्पण शनिवारी श्री. संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे. भिडे गुरुजी प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात येत आहेत. तरी शिवभक्त आणि हिंदुत्ववादी संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकत्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख मंगेश पाटील आणि वेंगुर्ले तालुका कार्यवाह प्रज्वल कोयंडे यांनी केले आहे.










