आदिवासी मुलाला मारहाण ?

जखमी अवस्थेत झाला रुग्णालयात दाखल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 23, 2026 20:18 PM
views 51  views

कणकवली : आदिवासी समाजातील १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी अवस्थेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोहोचला अन् पोलीस यंत्रणेसह सामाजिक कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. आपणाला कणकवली शहरातीलच एका भागामध्ये काही तरुणांनी मारहाण केल्याचे हा मुलगा सांगत होता. मात्र पोलिसी तपासात तसे काहीच आढळून येत नव्हते. कातकरी मुलाने स्पॉट दाखवला, तेथे दगडी चिऱ्यावर रक्ताचे डागही दिसून आले. मात्र आजूबाजूच्या घरांमध्ये चौकशी केली असता असा मारामारीचा प्रकार घडल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही, असे नागरिकांनीही सांगितले. पोलिसांनी खात्री करण्यासाठी परिसरातील काही सीसीटीव्हीही तपासले. मात्र सदर मुलाला कोणी मारहाण केल्याचे 'कन्फर्म, होऊ शकले नव्हते. हा मुलगा पडून जखमी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तरीही पोलीस अद्यापही घटनेचा तपास करत आहेत.