
वेंगुर्ले : वायंगणी गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या गावला पर्यटनातून विकसित करून येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांची आर्थिक उन्नती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे वायंगणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळात विकास निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी वायंगणी येथे केले. वायंगणी गावातील विविध ११ विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. मनीष दळवी साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच वायंगणी ग्रामपंचायतचे सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच रवींद्र धोंड व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे वायंगणी गावाला ११ विकास कामांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
येथील गव्हाणी मंदिर ते दाभोली गोठण रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे यासाठी ६ लाख ९९ हजार, रेडी, मालवण मुख्य रस्ता ते तळेकरवाडी विठ्ठल मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे यासाठी ६ लाख ९९ हजार, दाभोली वायंगणी रस्ता इ. जि. मा. ५२ मजबुतीकरण करणे यासाठी २० लाख, वायंगणी आवेरा कोंडाची मळी येथे बंधारा बांधणे यासाठी २२ लाख ४८ हजार, वायंगणी शाळा नं. १ अंगणवाडी दुरुस्ती करणे यासाठी २ लाख ५० हजार वायंगणी पोयंडीवाडी जवळील समुद्र किनारी जाण पोच रस्ता सिमेंटीकरण करणे यासाठी २० लाख, वायंगणी सुरंगपाणी येथील पोल शिफ्टिंग करणे यासाठी २ लाख, दाभोली वायंगणी रस्ता पोल शिफ्टींग करणे यासाठी ३ लाख,
हरिजनवाडी ते हरिचणगिरी रस्ता यासाठी ३० लाख, हरिचरणगिरी तिठा ते हरिचरणगिरी रस्ता यासाठी ३० लाख, वायंगणी शाळा नं. २ छप्पर दुरुस्ती यासाठी ६ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. येणाऱ्या ३ वर्षांमध्ये वायंगणी गावचा विकासात्मक कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट भाजपच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच अवी दुतोंडकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपसरपंच रवींद्र धोंड, सदस्य विनू मठकर, अनंत केळजी, महेश मुंणनकर, सविता परब, विद्या गोवेकर, विद्या कांबळी, राखी धोंड, नांदोस्कर, भाजप पदाधिकारी प्रशांत खानोलकर, माजी उपसरपंच हर्षद साळगावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, आबा धोंड, तसेच मोठ्या संख्येने वायंगणी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.










