आसोलीत शिवसेनेकडून विकासकामांची भूमिपूजनं

Edited by: दिपेश परब
Published on: January 09, 2026 15:46 PM
views 26  views

वेंगुर्ले : तालुक्यातील आसोली ग्रामपंचायत हद्दीतील आसोली, फणसखोल, धाकोरे, आजगाव मुख्य रस्ता ते घनश्याम गावडे घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संघटक सुनिल डुबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 

आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक जनसुविधा अंतर्गत या मंजूर कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, सुनिल मोरजकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, संजय गावडे, उपसरपंच संकेत धुरी, नंदकुमार घाडी, प्रथमेश सावंत, ग्रामस्थ जनार्दन गावडे, शशिकांत गावडे, दिलीप गावडे, निळकंठ गावडे, शैलेश गावडे, नारायण गावडे, हरी गावडे, संदेश गावडे, श्याम गावडे, सुरेश  नाईक, प्रदीप गावडे, शंकर गावडे, संतोष गावडे आदी उपस्थित होते.