
सिंधुदुर्गनगरी : संगणक आणि टीव्ही वर वेळ घालविण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांना स्क्रीन व्यसनमुक्ती आणि शारीरिक सामाजिक उपक्रमांकडे वळविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्क्रीन टाइम ते अँक्टिव्हिटी टाइम उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिंधुशौर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच असणार आहेत. त्यामुळे स्कीन व्यसनमुक्तीसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांत सहमंत्री स्नेहा धोटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद जिल्हा परिषद पत्रकार कक्षात पार पडली. यावेळी परिषदेच्या कोकण प्रांत सहमंत्री स्नेहा धोटे, कुडाळ शहरमंत्री दिग्विजय पोवार, जिल्हा संयोजक विनीत परब आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना स्नेहा धोटे म्हणाल्या की, सध्या विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त वेळ हा मोबाईल, संगणक किंवा टीव्ही यांच्यासमोर जात आहे. या स्क्रीन वरील ॲक्टिव्हिटी मुळे विद्यार्थ्या मैदानी खेळांपासून दूर होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्क्रीन व्यसनमुक्ती आणि शारीरिक सामाजिक उपक्रमांकडे वळविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्क्रीन टाइम ते अँक्टिव्हिटी टाइम उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिंधुशौर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा पाच तालुक्यात होणार आहेत. यात कबड्डी, बॅडमिंटन, क्रिकेटर, बुद्धिबळ, मॅरेथॉन आणि व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात दोडामार्ग तालुक्यात १७ जानेवारी रोजी कबड्डी स्पर्धा, १८ जानेवारी रोजी कुडाळ तालुक्यात बुद्धिबळ स्पर्धा, २४ व २५ जानेवारी रोजी वेंगुर्ला तालुक्यात बॅडमिंटन स्पर्धा, ३० व ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी सावंतवावी तालुक्यात क्रिकेट स्पर्धा, ८ फेब्रुवारी रोजी कुडाळ तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धा तर २० व २१ फेब्रुवारी रोजी कणकवली तालुक्यातील व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेच्या स्नेहा धोटे यांनी केले आहे.










