
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील बेपत्ता युवतीचा शोध घेण्यात देवगड पोलिसांना यश मिळाले असून देवगड पोलिसांकडून दोनच दिवसात या कॉलेज युवतीचा छडा लावण्यात यश मिळाले. ही विद्यार्थिनी तळेबाजार परीसरात सापडली असून तिची चौकशी करून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तळेबाजार साईनगर येथील १८ वर्षीय नापत्ता युवती मनीषा धुळा शिंदे हीचा शोध देवगड पोलीस घेत असताना ती तळेबाजार परीसरात सापडली आहे. ही युवती ५ जाने. २०२६ रोजी कॉलेजला जाणार असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. ही मुलगी नापत्ता झाल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी देवगड पोलीस स्थानकात दिली होती. त्या तक्रारीचा तपास तात्काळ देवगड पोलीस स्थानकाच्या सहा.पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या मार्गदर्शनाखील करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव सहा पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव पोलीस हवालदार महेंद्र महाडिक पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी केला आणि ती मुलगी तपास करीत असताना तळेबाजार परिसरात आढळून आली तिची चौकशी करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.










