
वेंगुर्ले : तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाचा बळी गेला होता. यावेळी मठ येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या तिठ्यावरील तिन्ही रस्त्याना स्पीडब्रेकर किंवा रंबलर्स बसवावे अशी मागणी ग्रामस्थांनी कोकणसाद लाईव्हच्या माध्यमातून करत रस्तारोकोचा इशारा दिला होता. या नंतर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग ऍक्शन मोडवर आले आहे. बांधकाम विभागाच्या आदेशाने रस्त्यानजीक विद्युत वितरण विभागाने खोदून ठेवलेले चर बुजवले आहेत. तर आजपासून रस्त्यांना रंबलर्स घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
याबाबत मठ येथील सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक, प्रशांत बोवलेकर, सौरभ परब, युवराज ठाकूर, सुधीर बोवलेकर , आना बोवलेकर, शैलेश राणे, बाबल काजरेकर, मंगेश ठाकूर, निलेश नाईक , रिक्षा चालकमालक अध्यक्ष प्रल्हाद सोन्सुरकर ,नंदू राणे, स्वप्नील गडेकर इत्यादी मठ ग्रामस्थ यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता रोकोचा इशारा दिला दिला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ऍक्शन मोड वर आले आहे. सर्वप्रथम विद्युत वितरण विभागामार्फत लाईन टाकण्यासाठी सुमारे १ ते दीड महिने खोदून ठेवलेले चर बुजवण्यात आले. तर आज पासून बांधकाम विभागामार्फत रंबलर्स बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोकणसाद लाईव्ह च्या माध्यमातून ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही कामे तात्काळ हातात घेण्यात आली. याबाबत ग्रामस्थांनी कोकणसाद लाईव्हचे आभार व्यक्त केले आहेत.











