आ. दीपक केसरकरांनी घेतली नगराध्यक्ष श्रद्धाराजेंची भेट

एकत्रितपणे काम करण्याचा व्यक्त केला विश्वास
Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2025 15:28 PM
views 104  views

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. केसरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवराज लखमराजे भोंसले उपस्थित होते.