
वेंगुर्ले : वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिसांच्या वतीने मॉब डिस्पर्सल, दंगा काबू योजना राबविण्यात आली. तसेच वेंगुर्ला बाजारपेठ येथील चार गदा मारुती मंदिर -गाडी अड्डा -दाभोली नाका- शिरोडा नाका असे पथ संचलन काढण्यात आले. या संचलनात ३ पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार, १ RCP प्लाटून, १० होमगार्ड सहभागी झाले होते. अशी माहिती वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.











