आपल्या भागातील खेळाडू देशात चमकण्यासाठी प्रयत्न करू : विशाल परब

वेंगुर्लेत खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेला उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: October 19, 2025 14:58 PM
views 66  views

वेंगुर्ले : व्हॉलीबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. अनेक युवक या माध्यमातून एकत्र येतात. या खेळत एक वेगळा जोश आहे. अनेक युवक याकडे आकर्षित होतात. युवकांना शारीरिक दृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी या खेळाचा मोठा फायदा होती. यामुळे अशा स्पर्धांमधून एखादा चांगला खेळाडू तयार होऊन तो महाराष्ट्रात, देशात चमकला पाहिजे या उद्देशाने ही स्पर्धा याठिकाणी तरुण मंडळींनी आयोजित केली आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. पुढील काळात कोणतीही मदत असेल भाजप पक्ष नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले येथे केले. 

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग व जय मानसीश्वर संघ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या उदघाटन प्रसंगी विशाल परब बोलत होते. यावेळी सर्वप्रथम विशाल परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून या दुसऱ्या दिवसातील स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सदस्य सुहास गवंडळकर, प्रा. आनंद बांदेकर, तुळस माजी सरपंच विजय रेडकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, समीर कुडाळकर, मनोहर तांडेल, आकांशा परब, सचिन शेटये, नामदेव सरमळकर, प्रार्थना हळदणकर , दीपेश केरकर, सुशील परब, आबा कांबळे, रुपेश नवार, निकीत राऊळ, माजी सरपंच सोमकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे जय मानसीश्वर संघाच्या वतीने हेमंत गावडे, सॅमसन फर्नांडिस, गौरव खानोलकर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर विशाल परब यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. 

या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यसहित, गोवा, केरळ, कर्नाटक, बेंगलोर आदी भागातील खेळाडू सहभागी झाले होते. यानंतर विशाल परब यांनी खेळाडूंशी संवाद साधत मैदानात श्रीफळ वाढवून दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश परब यांनी केले.