
वेंगुर्ला : इनरव्हील क्लब वेंगुर्लाच्या नूतन अध्यक्षपदी अपर्णा आनंद बोवलेकर तर सचिवपदी दीपाली प्रीतम वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन कार्यकरणीचा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता साई दिलक्स हॉल येथे संपन्न होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मावळत्या अध्यक्ष मंजुषा आरोलकर यांनी केले आहे.