
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आहेत. अरुण काणेकर स्मृति पुरस्कार कोकण प्रभातचे संपादक योगेश जयराम तांडेल, संजय मालवणकर स्मृति पुरस्कार लोकमतचे वेंगुर्ले प्रतिनिधी प्रथमेश विजय गुरव व पी. ए. केसरकर स्मृति पुरस्कार दैनिक पुढारीचे वेंगुर्ले वार्ताहर अजय अशोक गडेकर यांना जाहीर करण्यात आले आहेत.
वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाची सभा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष के. जी. गावडे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस. एस. धुरी, पत्रकार संघाचे सदस्य भरत सातोसकर, योगेश तांडेल, अजय गडेकर, प्रथमेश गुरव, सुरज परब आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त एस. एस. धुरी यांचे तालुका पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात आले.
सदर पुरस्कारांचे वितरण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात मान्यवरांच्या हस्ते करण्याचे निश्चित करण्यात आले. या सभेत २० जानेवारी रोजी सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी होणाऱ्या जिल्हास्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरविण्यात येऊन संघ निवड करण्यात आली.