वेंगुर्ले पं.स. चे निवृत्त विस्तार अधिकारी वामन चव्हाण यांचे निधन

Edited by: दिपेश परब
Published on: January 03, 2026 14:53 PM
views 34  views

वेंगुर्ले : वामन बाबली चव्हाण मुळ आंबोली सद्या वेंगुर्ला निवासी यांचे आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० (दहा) वाजता त्यांच्या वेंगुर्ला येथील ( जुन्या पंचायत समिती समोर, बँ. नाथ पै रोड) निवासस्थानावरून निघेल.

विस्तार अधिकारी (शिक्षण ) म्हणून त्यानी मालवण व वेंगुर्ला पंचायत समिती येथे काम केले होते. शिक्षण क्षेत्रातील एक चांगले मार्गदर्शक म्हणून ते परिचीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.