
दोडामार्ग : आपण मुलांना जे लहान वयात शिक्षण देतो तेच त्यांच्या भविष्याचा उज्वल पाया मजबूत करत असते. फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल जे संस्कारक्षम शिक्षण देत आहे ते मुलांना शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत करणारे आहे असे प्रतिपादन दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी केले.
दोडामार्ग येथील फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले यावेळी तहसीलदार राहुल गुरव यांच्यासोबत पत्रकार तेजस देसाई, जीवन विद्या मिशनचे राजाराम सावंत, नगरसेविका सौ. संध्या प्रसादी आदी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, अभिनय व नाट्यछटा यांचे मनमोहक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक व मान्यवर भारावून गेले.
लहान वयातच संस्कार, आत्मविश्वास व सर्जनशीलता विकसित व्हावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका कोमल नाईक, प्रास्ताविक संचालिका कीर्ती खोबरेकर यांनी केले. तर आभार शिक्षिका शितल पटकारे यांनी मानले.










