
वेंगुर्ला : कलावलय, वेंगुर्ला आयोजित आणि बी.के.सी.असोसिएशन मुंबई, पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात संपन्न होणार आहेत. स्पर्धेचे हे यंदाचे 29वे वर्ष आहे. दि.2 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर यांच्या हस्ते, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्ष दिलीप गिरप व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कारवा थिएटर्स, कोल्हापूर यांची "म्हव उठलाव', राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, ई·ारपूर यांची "हाल्फवे', गंधर्व थिएटर्स, मिरारोड यांची "कडी', अखिल महाराष्ट्र नाट¬ विद्यामंदिर समिती व आर्यरूप नाट¬संस्था, सांगली यांची "इन सर्च ऑफ' आदी एकांकिका सादर होतील.
दि.3 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून आयडियल इंग्लिश स्कूल, नेरूरची "देवराई', बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळची "वन सेकंदस् लाईफ', थिएटरवाले, मुंबई यांची "हिरो नंबर वन', अक्षरसिंधु कलामंच, कणकवली यांची "भरकाट', पृथा थिएटर्स, वेंगुर्ला यांची "अमृतस्य पुत्र', गवाक्ष व्हिजन, ठाणे यांची "मर्सिया', अवयुक्त मुंबई यांची "पडदा' आदी एकांकिका तर दि. 4 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून रंगवलय, अंधेरी यांची "बार बार', देशभक्त रत्नाप्पा कुमार कॉलेज ऑफ कॉमर्स यांची "ग्वाही', इंद्रधनु रंगमंच, बोरिवली यांची "द फॅन्टसी', दुपारी 3 वाजल्यापासून क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई यांची "तळ्यात मळ्यात', नाटकवेडे रत्नागिरी यांची "श्यामची आई', ज्ञान प्रसारक मंडळ महाविद्यालय व संधोधन केंद्र, म्हापसा यांची "सुनरी सखी', कलासक्त मुंबई यांची "पेंडुलम', शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर यांची "होळी झाली' आदी दर्जेदार एकांकिका सादर होतील. रसिकांनी या सर्व एकांकिकांना उपस्थित रहावे असे आवाहन कलावलय परिवारातर्फे केले आहे.









