
कणकवली : मूळ श्रावण - तळेवाडी (ता. मालवण) व सध्या कणकवली शहरातील नाथ पै नगर येथे वास्तव्यास असलेल्या अनिता दीपक राणे (३५) यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
अनिता या माजी आमदार राजन तेली यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून कामाला होत्या. तेली यांच्या बंगल्याच्या पाठीमागे कामगारांसाठी बनविण्यात आलेल्या खोलीत त्या राहत होत्या. अनिता यांचे पती आपल्या श्रावण गावी असतात तर सोबत असणारी दोन्ही मुले कुठेतरी बाहेर गेली होती. याच दरम्यान, अनिता यांनी फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत प्रसाद रमाकांत तेली (४०, रा. कणकवली - नाथ पै नगर) यांनी दिलेल्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.









