
सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता : ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण, सकाळी 9:30 वा : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुक्यातील ' बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार' महोत्सवात उपस्थिती.
सकाळी 11 वा : मोटारीने ओरोस कडे प्रयाण
दुपारी 12:30 वाजता : जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग मधील विकास कामांसंदर्भात आढावा बैठक
(स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )
दुपारी 1:30 वाजता : शिरोडा - वेळागर येथील हॉटेल ताजच्या जमिनी संदर्भात बैठक (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग)
दुपारी 2:00 वाजता: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू प्रश्नांबाबत बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग )
दुपारी 2:30 वाजता: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरे - खाण व्यवसायिकांच्या समवेत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग )
सायं 5:00 वाजता: देवगड व वैभववाडी तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची भेट तसेच देवगड पाणीपुरवठा योजनेसाठी नियुक्त स्थायी समिती समवेत बैठक
(स्थळ :शासकीय विश्रामगृह कणकवली)
सायंकाळी 7:00 वाजता: मोटारीने वेंगुर्ला कडे प्रयाण
सायं. 7:30 वाजता : वेंगुर्ला नगर परिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची सदिच्छा भेट
(स्थळ :भाजपा कार्यालय वेंगुर्ले)
रात्री 8:00 वाजता : मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण
रात्री 8:30 वाजता : सावंतवाडी नगर परिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची सदिच्छा भेट
(स्थळ :भाजप कार्यालय सावंतवाडी)
रात्री 9: 00 वाजता मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण









