विशाल परब यांचा मेस्त्री कुटुंबियांना मदतीचा हात

Edited by: दिपेश परब
Published on: December 27, 2025 11:17 AM
views 34  views

वेंगुर्ले : तालुक्यातील मठ कुडाळ तिठा येथे नुकताच अपघात होऊन या अपघातात मदन मेस्त्री यांना आपला जीव गमावला. मेस्त्री कुटुंबीयांचा एकमेव आधार हरपला. यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून अपघातात मृत्यू झालेल्या मदन मेस्त्री यांच्या कुटुंबियांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मेस्त्री यांच्या पश्चात ५ वर्षाची मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. त्यांना आर्थिक मदत म्हणून भारतीय जनता पार्टी व विशाल परब यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. या वेळी भाजप प्रदेश सदस्य राजू राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, तेंडोली सरपंच भाऊ पोतकर, परबवाडा माजी उपसरपंच हेमंत गावडे आदी उपस्थित होते.